मुंबई

मुंबईकरांनो नियमांचं पालन करा, नाहीतर तयार व्हा नाईट कर्फ्यूला

समीर सुर्वे

मुंबई: कोविडचा फास पुन्हा आवळू लागल्यामुळे राज्यातील काही भागात निर्बंध करण्यात आले आहे. मात्र मुंबईत आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेऊन नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पहिल्या पंधरावड्यानंतर रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर महानगर पालिकेने नियमांची कठोर अमंलबजावणी सुरु केली. मात्र तरीही रुग्णसंख्या रोजच्या रोज वाढत आहे. रविवारी 1 हजार 962 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महानगर पालिका आता नियम अधिक कठोर करण्याबाबत विचार सुरु आहे. आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत राहिल्यास नाईट कर्फ्यूसारखा निर्णय घ्यावा लागेल असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महानगर पालिकेच्या अंदाजानुसार लोकल पेक्षा लग्न सोहळे,हॉटेल बार तसेच बाजारांमधून कोविड जास्त पसरत आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आहे. या बैठकीत नियमांचे कटेकोर पालन करा अथवा कठोर नियम करावे लागतील असे आदेशच दिले आहेत. त्यामुळे आता मुंबईतील रुग्ण संख्या कमी न झाल्यास नाईट कर्फ्यूसारखे कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहलही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांना भरारी पथके तयार करुन उपहारगृह, बार, पब आणि हॉटेलमध्ये नियमांचे पालन होत आहे का नाही यावर लक्ष ठेवावे अशी सूचना केली आहे.
 
आठवडाभरातील रोज आढळलेले रुग्ण

रविवार - 1962
शनिवार-1708
शुक्रवार- 1572
गुरुवार - 1393
बुधवार - 1443
मंगळवार - 932
सोमवार - 995

---------------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Decision on night curfew taken after reviewing situation Mumbai for week

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT